'संजय आणि लीला'च्या लग्नाची ऐन लग्नसराईत जबरदस्त हिट कहाणी!

 


सुपरहिट ‘सिरी लंबोदर विवाह’ कन्नड चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!


मुंबई : लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ या नावाने मराठीत पहायला मिळणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

एकाच शाळेत आणि ट्यूशनला जाण्यापासून संजय आणि लीला एकत्र मोठे झाले आहेत. शिक्षण पूर्ण  केल्यानंतर विवाह संस्था उघडतात. तेव्हा त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या एका लग्नाच्या  नियोजनाची संधी मिळते. या लग्नादरम्यान १०० कोटींचा एक रहस्यमय गोंधळ उद्भवतो आणि गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. हे वळण नेमकं कुठे जाऊन पोहचणार, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे विलक्षण दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक सौरभ कुलकर्णी यांनी केले असून अंजन भारद्वाज आणि दिशा रमेश या जोडीचे या चित्रपटातून सुपरहिट पदार्पण झाले आहे.

"दाक्षिणात्य चित्रपटांतून दाक्षिणात्य संस्कृती आणि खास कला आपल्याला पहायला आणि अनुभवायला मिळते. चित्रपटांमधून विविध संस्कृतींची देवाण घेवाण व्हावी, आणि चांगली कलाकृती भाषेच्या बंधनात अडकून न राहता प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

'संजय आणि लीला'च्या लग्नाची ऐन लग्नसराईत जबरदस्त हिट कहाणी! 'संजय आणि लीला'च्या लग्नाची ऐन लग्नसराईत जबरदस्त हिट कहाणी! Reviewed by ANN news network on ४/०२/२०२४ ०९:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".