विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माफी मागा!; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान

 

 

अमरावती : अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठीविदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच न केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचीआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागून प्रायश्चित्त घ्याअसे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी अमरावती येथील जाहीर विजय संकल्प सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले.


अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा- महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भर पावसात झालेल्या सभेत आज अमित शाह यांनी शरद पवारउबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरेकाँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसइंडी आघाडीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवार हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतेकेंद्रात कृषीमंत्री होतेपण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाहीत्यामुळेच विदर्भातील हजारो शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची माफी मागाअसे आव्हानही त्यांनी दिले.




मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउमेदवार नवनीत राणाखा. डॉ .अनिल बोंडेआ. प्रवीण पोटेआ. प्रकाश भारसाकळेआ. रवी राणाभाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.भाजपाला 400 हून अधिक जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणारआरक्षण रद्द करणारअसा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. या अपप्रचाराला बळी पडू नकागेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षण रद्द केले नाहीतर बहुमताचा वापर करून 370 कलम रद्द केलेदहशतवाद संपविलातिहेरी तलाक प्रथा रद्द केलीआणि सीएए कायदा जारी करण्यासाठी बहुमताचा उपयोग केला. जोपर्यंत देशात भारतीय जनता पार्टी आहेतोवर एससीएसटी व ओबीसींचे आरक्षण कोणीही रद्द करू शकणार नाहीही मोदींची गॅरंटी आहेअशी ग्वाही श्री.शाह यांनी दिली. नवनीत राणा यांच्यासाठी दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महत्वाचे आहेदेशातील दहशतवाद आणि नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी महत्वाचे आहे आणि भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी महत्वाचे आहे. तुमचे प्रत्येक मत देशप्रेमी आणि देशविरोधी यांच्यातील लढाईत देशप्रेमींच्या बाजूने जाणार आहेपरिवारवादी आणि रामराज्यवादी यांच्यातील लढाईत रामराज्यासाठी जाणार आहेअसेही ते म्हणाले.


श्री.शाह म्हणाले की,अयोध्येतील राम मंदिराला काँग्रेसचा व इंडी आघाडीचा कायमच विरोध होता. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून 70 वर्षानंतरही काँग्रेस व त्यांच्या आघाडीने अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लोंबकळत ठेवला. सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांतच मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केलीआणि रामलल्लाची प्रतिष्ठापना करून मोदी यांनी रामभक्तांची अनेक दशकांची इच्छाही पूर्ण केली. या मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले,पण सोनिया गांधींच्या भीतीने त्यांनी ते नाकारले. शरद पवारांनाही निमंत्रण दिले,पण प्रकृतीचे कारण देत त्यांनी पाठ फिरविली. प्रकृती ठीक नव्हतीतर आता प्रचारासाठी कसे हिंडताअसा खोचक सवालही त्यांनी केला. या लोकांनी मंदिर उभारणीत अडथळे आणलेचपण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून रामाचा अपमान केलाअशी टीकाही त्यांनी केली. केवळ अयोध्याच नव्हेतर केदारनाथ,बद्रीनाथसोमनाथ आदी पवित्र स्थानांचे पुनरुज्जीवन मोदी यांनी केलेअसे ते म्हणाले. दहा वर्षांत मोदीजींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा सत्तेवर आल्यावर पाच वर्षांतच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार असून याचा फायदादलितआदिवासी,वंचित,उपेक्षित सर्वांना होणार आहे. म्हणूनचमोदीजींच्या झोळीत मतांचे दान टाकून भाजपाला प्रचंड मतांनी विजयी कराअसे आवाहन त्यांनी केले. मोदी यांनी अनेक कामे केलीपण काही कामे तर मोदी यांच्याखेरीज कोणीच करू शकले नसतेअसेही ते म्हणाले.


काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील एकएक तरुण काश्मीरसाठी प्राण देण्यास सिद्ध आहेपण काँग्रेसला याची जाणीवच नाही. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यावर 5 ऑगस्ट 2019 ला मोदींनी कलम 370 रद्द करून काश्मीरला भारताचा कायमस्वरुपी अविभाज्य भाग बनविलातर काँग्रेस मात्र कलम 370 ला एखाद्या अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून बसली होतीअशी टीकाही त्यांनी केली. दहा वर्षे सोनिया-मनमोहनसिंह यांचे सरकार होतेशरद पवार हे त्यांच्या सरकारात मंत्री होतेपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाहीअसा थेट आरोप त्यांनी केला.



मोदी सत्तेवर आलेआणि पुलवामावर केलेल्या हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा धडा त्यांनी शिकविला. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी दहशतवादाचा सफाया केला. महाराष्ट्राला नक्षलवादापासून मुक्त करण्याचे काम मोदीजींनी केले. काँग्रेस सत्तेवर आली तर तिहेरी तलाक पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. पण काँग्रेसला पुन्हा सत्ता द्यायची नाही असा निश्चय जनतेनेच केला आहेअसे सांगून शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीतील जनहिताच्या कामांचा संपूर्ण तपशील सभेसमोर ठेवला. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर 70 वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचारघरोघर पाईपद्वारे गॅस जोडणी ही मोदी सरकारची गॅरंटी आहेअसेही ते म्हणाले. विदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या विकास कामांचा आणि पाणी योजनांची यादीच शाह यांनी सभेसमोर ठेवली. नवनीत राणा यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत अमरावती मतदारसंघात केलेल्या विविध कामांची माहितीही त्यांनी दिली.

 

विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माफी मागा!; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माफी मागा!; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान Reviewed by ANN news network on ४/२४/२०२४ ०६:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".