काळजी घेण्याचे आवाहन
पुणे : पुणे परिसरातील तापमान ६ एप्रिलपर्यंत ४० अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असून नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे परिसरात मागील दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. शिवाजीनगर आणि लोहगाव या दोन्ही ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून, येत्या काही दिवसांत लोहगावचे तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
नागरिकांनी दीर्घकाळ उन्हात जाणे टाळावे. हवेशीर जागेत रहावे तसेच भरपूर पाणी प्यावे. वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे परिसरात पारा ४० अंशांवर जाण्याची शक्यता; उष्णतेची लाट!
Reviewed by ANN news network
on
४/०१/२०२४ ०८:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: