पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीसठाण्याच्या पथकाने १ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख भागात एका तरुणाकडून २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. याची किंमत सुमारे २ कोटी २ लाख इतकी आहे. त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नमामी शंकर झा, वय ३२ वर्षे, रा.संजय पाटील यांचे खोलीत, सेक्टर नं. २७, भेल चौक, निगडी पुणे मूळ गाव मेहनात पैवती, ता. महीनाम, जि. दरभंगा, राज्य - बिहार असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर सांगवी पोलीसठाण्यात ७५/२०२४ क्रमांकाने एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलीसकोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवी पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक नारायण पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे पथक १ मार्च रोजी पहाटे पिंपळे निलख भागात गस्त घालत होते. ते पहाटे साडेचारच्या सुमारास रक्षकचौकाच्या पुढील बाजूस असलेल्या डी.पी. रोडवर आले असता त्यांना हातात पांढर्या रंगाची पिशवी घेऊन जाताना एक तरुण दिसला. पोलिसांची गाडी पाहताच तो घाईगडबडीत निघून जाऊ लागला. त्यावेळी त्याला थांबवून पिशवीत काय आहे अशी चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर त्याने पिशवीत मेफेड्रोन असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पिशवीसह मेफेड्रोन आणि त्याचा मोबाईल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी,उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. श्री विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र घाडगे,वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक नारायण पाटील, उपनिरीक्षक नवनाथ चापाले, अंमलदार शिंदे, गायकवाड,मोरे, गोडे, पाटील, खंडागळे, पाटील, डंगारे, शिंगोटे,माने,लेकुरवाळे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: