प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नाट्य कलाकारांनी सादर केले "प्रेमा तुझा रंग कसा "नाटक

 


बाबू डिसोजा कुमठेकर 

निगडी : मनोहर वाढोकर सभागृहात  प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित, प्रा. वसंत कानेटकर लिखित,  प्रेमाचे गहिरे रंग उलगडणारे अजरामर नाटक "प्रेमा तुझा रंग कसा" हे संघाच्या ज्येष्ठ कलाकारांनी सादर केले. 

 नाटकाला  नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला . या नाटकाचा प्रयोग अत्यंत नेटका, बहारदार आणि एखाद्या व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा झाला ,असे मत प्रेक्षकांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केले. 

नाटकाचे दिग्दर्शन श्री. अशोक अडावदकर यांनी उत्कृष्ट रित्या केले होते. या नाटकात ज्योती कानेटकर ( प्रियंवदा) , सुभाष भंडारे (बाजीराव), अनुराधा पेंडुरकर (बब्बर), चंद्रशेखर जोशी ( बच्चू) , सुनिता येन्नूवार ( सुशील) सतीश सगदेव ( निळूभाऊ) आणि अशोक अडावदकर ( प्रा. बल्लाळ) या भूमिका  उत्तम रीतीने सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
 
 सर्व कलाकारांचा सत्कार, माजी उपमहापौर शैलजा मोरे  यांच्या हस्ते सन्मानचिन्ह  देऊन करण्यात आला. तसेच शोभा भंडारे यांचा सत्कार त्यांच्या विशेष योगदानासाठी शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. या नाटकासाठी डॉ.ज्योती इंगोले, नाट्य समिती प्रमुख, ज्येष्ठ नागरिक संघ प्राधिकरण यांचे सहकार्य लाभले. पन्नास वर्षांपूर्वी ज्यांनी ह्या नाटकात भूमिका केल्या होत्या अशा ३ कलाकारांचा यथोचित गौरव करण्यात आला.त्यामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद त्यांना मिळाला.  ह्या नाटकाचे गारुड , इतक्या कालावधीनंतर सुध्दा रसिकांवर आहे हेच सिद्ध झाले.

रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे, संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते, रसिकांनी, नेमक्या ठिकाणी उस्फूर्त दाद देऊन, कलाकारांना प्रोत्साहन दिले.
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नाट्य कलाकारांनी सादर केले "प्रेमा तुझा रंग कसा "नाटक प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नाट्य कलाकारांनी सादर केले "प्रेमा तुझा रंग कसा "नाटक Reviewed by ANN news network on ३/०३/२०२४ ०८:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".