चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील व्याख्याते, साहित्यिक राजेंद्र घावटे यांच्या "चैतन्याचा जागर" या विचारसंग्रहरुपी ग्रंथाला शिवांजली साहित्य सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चाळकवाडी (पिंपळवंडी) ता. जुन्नर येथे नुकताच "एकतीसावा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव" झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते राज्यभरातील उल्लेखनीय साहित्य कृतींचा सन्मान करण्यात आला.राजेंद्र घावटे लिखित "चैतन्याचा जागर" या साहित्य कृतीचा दिवंगत साहित्यिक पारू कडाळे स्मृती पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी शिवांजलीचे अध्यक्ष शिवाजी चाळक , छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. महेश खरात, अकोला येथील अनंत भोयर, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, माजी शिक्षण सचिव अनिल गुंजाळ व राज्यभरातील साहित्यिक उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी प्रमाणे शिवांजली साहित्य महोत्सवाचे आयोजन शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते.
घावटे यांचे स्थानिक साहित्य संस्थांनी, साहित्यिकांनी अभिनंदन केले.
राजेंद्र घावटे यांच्या चैतन्याच्या जागरला शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
३/०३/२०२४ ०८:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/०३/२०२४ ०८:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: