पुणे : सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेला अॅन्टीकरप्शन खात्याने २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
शकुंतला माने असे या लाचखोर महिलेचे नाव आहे.या प्रकरणी तक्रार देणारी व्यक्ती प्राध्यापक असून त्याने अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळविण्यासाठी आपला प्रबंध विद्यापीठाकडे ऑनलाईन सादर केला होता. या प्राध्यापकाला गाईड म्हणून शंकुतला मानेंची नियुक्ती करण्यात आली होती. तक्रारदार प्राध्यापकाचा रिजेक्ट झालेला प्रबंध पुन्हा सुधारणा करून सादर करण्यासाठी परवानगी देण्याकरिता शकुंतला माने हिने त्याच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्या प्राध्यापकाने अॅन्टीकरप्शन खात्याकडे तक्रार केली. या खात्याच्या अधिकार्यांनी सापळा लावला. ३० मार्च २० हजार रुपयांची लाच घेताना शकुंतला माने हिला 'रंगेहाथ' पकडण्यात आले. तिच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपअधीक्षक सुदाम पाचोरकर, सहाय्यक फौजदार मुकुंद अयाचित, अंमलदार चेतन कुंभार, पूनम पवार, चालक अंमलदार माळी यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: