दि.२ ते ७ एप्रिल रोजी गाडगीळ आर्ट गॅलरी (औंध) येथे आयोजन
पुणे : युवा चित्रकार सुरेंद्र कुडपणे- पाटील यांच्या 'क्षितिज'(होरायझन) या चित्र प्रदर्शनाचे आयोजन दि.२ ते ७ एप्रिल रोजी पु.ना.गाडगीळ अँड सन्स आर्ट गॅलरी (औंध) येथे आयोजित करण्यात आले आहे.अमूर्त(अब्स्ट्रॅक्ट) शैलीतील ही चित्रे असून प्रत्येक चित्र ही नवनिर्मिती आहे.या चित्रांची रचना क्षितिजाचा भास करून देते.वेगळ्या रचना, सुखद रंगसंगती, साधेपणा हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहे.या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ कलाकार आणि फर्निचर व्यावसायिक सुहास एकबोटे यांच्या हस्ते तसेच सुरेंद्र कुडपणे- पाटील मित्र परिवाराच्या उपस्थितीत दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ अशी आहे.प्रवेश विनामूल्य आहे.
सुरेंद्र कुडपणे-पाटील यांचा चित्र प्रवास
आतापर्यं २५ पेक्षा जास्त एकल आणि दीडशे पेक्षा जास्त समुह प्रदर्शनमध्ये सुरेंद्र यांनी चित्र प्रदर्शित केली आहेत.कला प्रवासामध्ये अनेक महत्त्वाची पारितोषिके मिळाली आहेत .तसेच त्यांनी मास्टर्स पर्यन्त चे शिक्षण घेत असताना कायम प्रथम क्रमांक आणि गोल्ड मेडल त्यांनी मिळवले आहे.सुरेंद्र कुडपणे- पाटलांची चित्र भारतात तसेच अनेक देशांमध्ये संग्रहित आहेत.
Reviewed by ANN news network
on
३/३१/२०२४ ०१:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: