हिंदु जनजागृती समितीकडून जयगड आणि रसाळगड येथे 'एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात' मोहीम!


मोहिमेच्या अंतर्गत गडांची स्वच्छता, सामूहिक नामजप आणि व्याख्यान!


रत्नागिरी :  छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी राजे आणी मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडदुर्गातून धर्मकार्य करण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ मार्च या दिवशी 'एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात' या एक दिवसीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गडावरील स्थानदेवता श्री झोलाई देवीच्या चरणी प्रार्थना करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. समितीचे श्री.विलास भुवड आणि श्री.प्रकाश कोंडसकर यांनी सहभागी युवक आणी युवतींना गडावरील ऐतिहासिक ठिकाणे दाखवून तेजस्वी इतिहासाची माहिती दिली. सहभागी युवकांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वछता करत गडावरील प्लास्टिकच्या पिशव्या,काचेच्या बाटल्या गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली. या मोहिमेत जिल्ह्यातील ४७ युवक-युवती सहभागी झाले होते.

उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करताना समितीचे श्री. विलास भुवड म्हणाले, आज संपूर्ण भारतभूमीमध्ये अराजकता पसरलेली आहे. हिंदू धर्म,संस्कृती आणि हिंदूंचे अस्तिव धोक्यात आले आहे. लव्ह जिहाद,लँड जिहाद,गड दुर्गांवरील अतिक्रमण या आणि अशा अनेक संकटांनी हिंदू धर्म संपवण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. ज्या प्रमाणे छत्रपती शिवरायांनी आई भवानीच्या कृपेने पाच पातशाह्यांचा निःपात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आज छत्रपती शिवरायांचा मावळा बनून आपल्याला देखील देव,देश,धर्म रक्षणार्थ सिद्ध व्हायला हवे. त्यासाठीची आवश्यक शक्ती आणि प्रेरणा आज आपल्याला ईश्वरीय कृपेनें या मोहिमेतून मिळणार आहे. आपण सर्वांनी 'मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे' हा भाव मनात ठेवून येथून पुढे राष्ट्र व धर्म रक्षणाच्या कार्यात सहभागी होऊन भगवंताची कृपा संपादन करून घेऊया.

कु.आर्यन वैराग, कु.आर्यन वैराग, कु.पार्थ घाग,चिंतामणी रबसे आदींनी श्री.गड किल्ले केवळ बघायला न जाता छत्रपती शिवरायांच्या विचारांनुसार जेव्हा आपण कार्य करण्यास सुरुवात करू, त्याच वेळी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणवून घेण्याच्या पात्रतेचे ठरु.अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हिंदु जनजागृती समितीकडून जयगड आणि रसाळगड येथे 'एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात' मोहीम!  हिंदु जनजागृती समितीकडून  जयगड आणि रसाळगड येथे 'एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात' मोहीम! Reviewed by ANN news network on ३/२३/२०२४ ०३:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".