विश्व हिंदु परिषद आणि कलारंग आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

 


पिंपरी : विश्व हिंदु परिषद, पिंपरी चिंचवड आणि कलारंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील ४२ शाळांमधील सहावी ते बारावी या वर्गात शिकणार्‍या १ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच नॉव्हेल शिक्षणसंस्थेत पार पडला.या समारंभासाठी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह माहेश्वरी मराठे, सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे, नितीन वाटकर, विश्व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष धनंजय गावडे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, संदेश गादिया आदी उपस्थित होते.

 या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ रोख १५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक १० हजार रुपये व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक कै. गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख ७ हजार ५०० रुपये व स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक कै.सुरेश गादिया यांच्या स्मरणार्थ रोख ५ हजार रुपये व स्मृतीचिन्ह, कै. सुनंदा यशवंत मिठभाकरे  यांच्या स्मरणार्थ रोख २ हजार १०० रुपये व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले होते.

  या स्पर्धेत प्रथम क्रमांक वी.के. माटे स्कूलमधील  मल्हार नरहरी प्रभुमिराशी याने पटकवला., तर द्वितीय क्रमांक एस.एन.बी.पी. स्कूलमधील आर्या सुनिल निंबाळकर हिने पटकवला आहे, तृतीय क्रमांक कमलनयन बजाज स्कूलमधील प्रेरणा शिर्के हिला मिळाला आहे. तसेच चतुर्थ क्रमांक सिटीप्राइड स्कूलचा सिद्धांत अगरवाल याने पटकवला आहे,पाचवा क्रमांक नॉव्हेल स्कूलची पायल नारखेडे हिला मिळाला आहे.

स्पर्धेचे परीक्षण पिंपरी चिंचवड मधील चित्रकार सुनील शेगावकर, प्रसिद्ध फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, प्रसिद्ध मूर्तिकार सदानंद टिपूगुडे, सुमित काटकर व ज्योती कुंभार यांनी केले.

कलारंग सांस्कृतिक कलासंस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी सर्वांचे आभार मानले.


विश्व हिंदु परिषद आणि कलारंग आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात विश्व हिंदु परिषद आणि कलारंग आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात Reviewed by ANN news network on २/०७/२०२४ ०४:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".