गायक जयदीप बगवाडकरचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 'ओ भाऊ ओ दादा ..'

 


घराणेशाही आणि सत्तानाट्याचा खेळ रंगणार..!

 

मुंबई : 'लोकशाहीहा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. घराणेशाहीतल्या या सत्तासंघर्षात नेमके काय आव्हान असणार आहे आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहेहे गुपित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत संजय अमर दिग्दर्शित 'लोकशाहीचित्रपटातील 'ओ भाऊ ओ दादा..',  हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला ५ फेब्रुवारीला आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजेसुप्रसिध्द गायक जयदीप बगवाडकर यांनी आजवर मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संगीत क्षेत्रातील नामांकित दिग्गजगायिका श्रेया घोषालवैशाली सामंतबेला शेंडे तसेच गायक अवधूत गुप्ते यांच्यासोबत अनेक रिअॅलिटी शोज केले आहेत.

जयदीप बगवाडकर यांचे सूर लाभलेल्या या गाण्याचे बोल संजय अमर यांचे असून या गाण्यामधून अभिनेता अंकित मोहन चा डॅशिंग लूक दिसत आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशेसमीर धर्माधिकारीतेजश्री प्रधानभार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत लोकशाही सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. इतकंच नव्हे तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

'अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लिकंपनीचे एमडी आणि सीईओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी  सांगितले कीअल्ट्रा च्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक एव्हरग्रीन चित्रपटांची प्रस्तुती करत आलेलो आहोत. तसेच वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीचा व प्रस्तुतीचा आमचा कल आहे. शिवाय या चित्रपटात राजकीय संघर्षावर आधारित 'ओ भाऊ ओ दादा..',  हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.'

गायक जयदीप बगवाडकरचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 'ओ भाऊ ओ दादा ..' गायक जयदीप बगवाडकरचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 'ओ भाऊ ओ दादा ..' Reviewed by ANN news network on २/०७/२०२४ ०४:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".