मुंबई : राज्यशासनाने ११ आय.ए.एस. अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.
विजय सिंघल यांची सिडको मुंबईचे व्हीपी आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय सेठी यांची वाहतूक आणि बंदर विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पराग जैन नैनोटिया यांची प्रधान सचिव (आयटी) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती.
ओ पी गुप्ता यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) वित्त विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेश कुमार यांची अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), महसूल आणि वन विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. हेमंत वासेकर यांची बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे येथे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कौस्तुभ दिवेगावकर यांची पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तपदी नियुक्ती.
कार्तिकी एन. एस. यांची सीईओ, स्मार्ट सिटी, पुणे म्हणून नियुक्ती.
मिलिंद शंभरकर यांची मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती.
एम. जे. प्रदीप चंद्रा यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
कवळी मेघना यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Reviewed by ANN news network
on
२/२७/२०२४ ११:४६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: