पुणे : पुणे महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण खात्याने ७ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडी परिसरातील डोंगरमाथा आणि उतारावर असलेली २९ बेकायदा बांधकामे पाडली.
आई माता मंदिर ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजूकडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिल्या. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाने परिसरात अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.
एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, एक महापालिका मनुष्यबळ गट, दोन पोलीस गट यांच्या साहाय्याने ही २९ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
ही कामगिरी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, कनिष्ठ अभियंता वंदना गवारी, पियुष दिघे, ट्युलिप इंजिनीयर प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाणे या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: