पुण्यातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उझबेकीस्तानी मॉडेल्स ताब्यात!


पुणे : पुण्यातील विमाननगर भागात सुरू असलेल्या उच्चभ्रू वेश्याव्यसायावर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालत एक राजस्थानी अभिनेत्री आणि दोन उझबेकिस्तानी मॉडेल्सना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमाननगर परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार ऑनलाईन माध्यमातून परदेशातून चालविला जात होता.यातील सूत्रधारांचा शोध पुणे पोलीस घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून चार मुलींना वाचवले होते.


पुण्यातील अवैध ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर

पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी पुण्यात वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून ते सापळे लावणे, माहिती मिळताच छापे टाकणे या सर्व गोष्टी पोलीस करत असून अनेक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईही केली जात आहे. परंतु, शहरात घडणाऱ्या घटनांवरून अवैध धंदे बंद होत नसल्याचे दिसून येत आहे.


पुण्यातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उझबेकीस्तानी मॉडेल्स ताब्यात!  पुण्यातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उझबेकीस्तानी मॉडेल्स ताब्यात! Reviewed by ANN news network on १/१७/२०२४ ०४:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".