रामायणातील प्रसंगावर आधारित चित्रकलास्पर्धा आयोजित

 


पिंपरी :विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड आणि कलारंग संस्कृती कला संस्था, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे आणि विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यामध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे.विद्यार्थ्यांना श्री राम यांचे चरित्र आणि त्यांच्या १४ वर्षांच्या वनवासात घडलेल्या घटना व घटनांची माहिती व्हावी या उद्देशाने या  भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार २० जानेवारी रोजी चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

रामायणातील घटनेवर आधारित आहेत…श्री राम शबरी भेट, श्री राम केवट भेट, नल नील आणि श्री राम, रावण वध, तुमची रामायणातील आवडती घटना… हे सर्धेचे विषय आहेत. स्पर्धेसाठी आपले नाव गुगल फॉर्म, मेल, फोन, शाळेच्या लेटरहेडवर नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, संभाजीनगर चिंचवड किंवा एसएनबीपी शाळा मोरवाडी येथे १७ ते १९ जानेवारी दरम्यान नोंदवावे. प्रत्येक शाळेतील ५० स्पर्धकांना सहभागी होण्याची परवानगी असेल. ही स्पर्धा २० जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी 9881280066,9921202421 या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रथम क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना स्व.हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्याला ७ हजार ५०० रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. कै.गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

रामायणातील प्रसंगावर आधारित चित्रकलास्पर्धा आयोजित रामायणातील प्रसंगावर आधारित चित्रकलास्पर्धा आयोजित Reviewed by ANN news network on १/१७/२०२४ ०५:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".