राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिवसृष्टीला भेट

 


शिवसृष्टीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उद्योग क्षेत्राला आवाहन करू - उद्योगमंत्री

पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नऱ्हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या 'शिवसृष्टी'ला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे, श्रीनिवास वीरकर,  उपजिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकारी अर्चना पाठारे, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.

रत्नागिरी येथील थिबा पॅलेस या ठिकाणी एक संदर्भ वाचनालय उभारण्याची संकल्पना असून त्यासाठी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. सामंत यांनी केले. 

शिवसृष्टीसारखा भव्य प्रकल्प उभारत असताना त्याला संपूर्णपणे आर्थिक पाठबळ देण्याची क्षमता ही राज्याच्या उद्योगक्षेत्रात असून राज्यातील उद्योगपतींना या प्रकल्पाची माहिती देत त्यांना मदत करण्याबाबत आवाहन करण्यात येईल, असे श्री. सामंत यावेळी म्हणाले.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिवसृष्टीला भेट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिवसृष्टीला भेट Reviewed by ANN news network on ९/३०/२०२३ ०८:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".