एनजीएफच्या ८ व्या राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३' सोहळ्यासाठी डॉ. प्रकाश, डॉ. मंदाकिनी आमटे, विश्वास नांगरे पाटील आणि मधुसूदन सुर्वे विशेष पाहुणे

 


मुंबई, : शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी गेल्या एका तपाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेली 'नूतन गुळगुळे फाउंडेशन' (एनजीएफ) ही मुंबईतील प्रख्यात संस्था असून या संस्थेचा ८-वा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार - २०२३ सोहळा" शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजीसंध्याकाळी ५:३० वा.पु.ल. देशपांडे सभागृहटिळक मंदिरविले पार्ले (पूर्व )मुंबई येथे संपन्न होणार आहे.

 

या खास सोहळ्यासाठी जंगलात वास्तव्य करणाऱ्या माडिया गोंड’ आदिवासी जमातीतील लोकांना भूकरोगराईअंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारेबाबांचे स्वप्न हेमलकशात प्रत्यक्षात उतरवणारे मॅगसेसे’ पारितोषिक विजेते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉ. मंदाकिनी ताई आमटेतसेच देशासाठी युद्धभूमीवर अलौकिक शौर्य गाजविणारे शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसुधन सुर्वे आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून परिचित असलेले युवा आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटीलएस बी आय जनरल इन्शुरन्सचे डेप्युटी मॅनेजिंग डिरेक्टर आनंद पेजावरपत्रकारव्यवसाय प्रमुख आणि एडिटर झी 24 तास - मीश्री निलेश खरे या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत यंदाचा 'नूतन गुळगुळे फाउंडेशन'चा ८ वा राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३सोहळा रंगणार असल्याचे एनजीएफच्या संस्थापिका - अध्यक्षा सौ नूतन विनायक गुळगुळे यांनी जाहीर केले आहे.

 

या सोहळ्यासाठी विविध भाषा - परंपरा आणि संस्कृती असलेल्या आपल्या देशातील अनेक राज्यांतून दिव्यांग स्पर्धकांच्या भरघोस प्रवेशिका प्राप्त होतातअलौकिक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांगांना पुरस्कार देऊन त्यांचे मनोबळ वाढविण्याचे काम करणारी ही देशातील पहिली संस्था आहे. 'नूतन गुळगुळे फाउंडेशन' ‘करोना१९मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग’ बालकांकरिता विरारअर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरु लवकरच सुरु करणार आहे. असा प्रकल्प राबविणारी भारतातील ही एकमेव संस्था ठरणार आहे. सध्या या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आले असून २०२४ च्या सुरुवातीला ४० मुले व ४० मुली आपल्या एकल पालकांसोबत येथे दाखल होणार आहेत.

 

शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या परंतु काहीतरी अद्वितीय कर्तृत्व सिद्ध  करून आपल्या कौशल्यांचा उत्तम वापर करून आपल्या व्यवसायात/जीवनात एखादी सर्वसाधारण व्यक्ती विचार करू शकणार नाहीअसे काहीतरी अलौकिक कार्य सिद्ध केलेले व्यक्तींचा गुणगौरव करणारा हा सोहळा आहे. वैयक्तिक श्रेणीतील नऊ पुरस्कारां सोबतच 'माय लेक पुरस्कार', 'कौटुंबिक पुरस्कार'(एकाच कुटुंबातील दोन /तीन सभासद दिव्यांग)तसेच 'संस्था पुरस्कार'( सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था), 'जीवन गौरव पुरस्कार' (६५ वर्षे व अधिक)आणि मरणोत्तर पुरस्कार असे पुरस्कार देण्यात येणार आहे. शालरोख रक्कम,  आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवमूर्तींचा सन्मान केला जातो.

एनजीएफच्या ८ व्या राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३' सोहळ्यासाठी डॉ. प्रकाश, डॉ. मंदाकिनी आमटे, विश्वास नांगरे पाटील आणि मधुसूदन सुर्वे विशेष पाहुणे एनजीएफच्या ८ व्या राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार-२०२३' सोहळ्यासाठी डॉ. प्रकाश, डॉ. मंदाकिनी आमटे, विश्वास नांगरे पाटील आणि  मधुसूदन सुर्वे विशेष पाहुणे Reviewed by ANN news network on ९/३०/२०२३ ०४:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".