होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन लाँच

 



नवी दिल्ली :  होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या देशातील सर्वात मोठ्या स्कूटर उत्पादक कंपनीने आज अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन लाँच केली. रू८०,७३४ अशी आकर्षक किंमत (एक्स शोरूम दिल्ली) असलेली नवी होंडा अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन आकर्षक व उपयुक्त डिझाइन आणि रायडिंगचा अनोखा अनुभव यांचा मिलाफ साधणारी आहे. या गाडीची बुकिंग सुरू झाली असून लवकरच ती देशभरातील होंडा रेड विंग वितरकांकडे मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध केली जाईल.

अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशनच्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, अ‍ॅक्टिव्हाने देशातील दुचाकी क्षेत्रात क्रांती घडवून आणली असून गेल्या दोन दशकांत लाखो भारतीयांना आनंद दिला आहे. सर्व वयोगटात लोकप्रिय झालेली ही भारतातील सर्वाधिक पसंतीची गाडी ठरली आहे. आम्हाला विश्वास वाटतो, की अ‍ॅक्टिव्हाची नवी मर्यादित आवृत्ती ग्राहकांना, विशेषतः नव्या युगातील ग्राहकांना आणखी आनंद देईल.

होंडाची नवी मर्यादित आवृत्ती सादर करताना होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, सणासुदीच्या काळासाठी अ‍ॅक्टिव्हाची नवी मर्यादित आवृत्ती सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आकर्षक रूप, स्मार्ट आधुनिक वैशिष्ट्ये आणि विश्वासार्ह इंजिन ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांच्या बदलत्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एचएमएसआय सातत्याने प्रयत्नशील राहील आणि ग्राहकांना अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध करून देईल.


होंडा अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन

अ‍ॅक्टिव्हाच्या लोकप्रिय डिझाइनचा वारसा पुढे नेणारी अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटरची स्टाइल आणखी उठावदार करणारी आहे. त्यासाठी या गाडीत गडद रंगाचा वापर करण्यात आला असून काळे क्रोम एलिमेंट्स, पहिल्यांदाच एचएमएसआय उत्पादनात वापरण्यात आले असून त्यासोबत बॉडी पॅनेल्सवर स्ट्रायकिंग स्ट्राइप्स देण्यात आले आहेत. अ‍ॅक्टिव्हा थ्रीडी एम्बलेमवर प्रीमियम ब्लॅक क्रोम गार्निश देण्यात आले आहे. तर रियर ग्रॅब रेलवरही गडद रंगाचे फिनिश देण्यात आले आहे.

तरुण ग्राहकांसाठी खास बनवण्यात आलेल्या अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशनमध्ये दोन आकर्षक रंगांच्या छटा वापरण्यात आल्या आहेत – मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू. गाडीचा एकंदर आरामदायीपणा वाढावा म्हणून डीएलएक्स व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर टॉप- स्पेक व्हेरिएंटमध्ये होंडाची प्रसिद्ध स्मार्ट की देण्यात आली आहे. अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशनमध्ये १०९.५१ सीसी, सिंगल सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ नियमाचे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन देण्यात आले आहे, जे ५.७७ केडब्ल्यू उर्जा आणि ८.९० एनएम टॉर्कची निर्मिती करते.

 

खास मूल्य

होंडा अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशनची किंमत रू. ८०,७३४ (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. एचएमएसआयतर्फे या स्कूटरवर १० वर्षांची वॉरंटी (३ वर्षांची नेहमीची आणि ७ वर्षांची पर्यायी) देण्यात येणार आहे.

 

 

व्हेरिएंट

किंमत (एक्स शोरूम दिल्ली)

अ‍ॅक्टिव्हा डीएलएक्स लिमिटेड एडिशन

रू८०,७३४

अ‍ॅक्टिव्हा स्मार्ट लिमिटेड एडिशनची

रू८२,७३४

 

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन लाँच होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे अ‍ॅक्टिव्हा लिमिटेड एडिशन लाँच Reviewed by ANN news network on ९/२८/२०२३ ०९:२९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".