इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सचिन खामगळ यांची फेरनिवड...!

 


गणेश मिंड
भिगवण : इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी निवड नुकतीच पार पडली असून यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजित पवार गट कार्याध्यक्षपदी शिरसोडी- पिंपरी खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य सचिन  खामगळ यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) प्रदीप गारटकर यांनी खामगळ यांना निवडीचे पत्र दिले असून,सचिन खामगळ हे माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

गेली तीन वर्षात सचिन खामगळ यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पद सांभाळले असून परिसरात त्यांना मानणारा युवकांचा मोठा वर्ग आहे. संघटनेत पक्ष वाढीसाठी काम करणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आमदार दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून सचिन खामगळ यांनी परिसरात आपली ओळख निर्माण केली आहे.

यावेळी बोलताना कार्याध्यक्ष सचिन खामगळ म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढीचे काम करू, आणि गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर साहेब तसेच तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे , माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले , सचिन सपकाळ , कार्याध्यक्ष अतुल झगडे , नवनाथ रुपनवर , युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर , संदेश देवकर उपस्थित होते.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सचिन खामगळ यांची फेरनिवड...! इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सचिन खामगळ यांची फेरनिवड...! Reviewed by ANN news network on ९/२८/२०२३ ०९:३२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".