पिंपरी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभेसाठी महिला आरक्षण बिल मंजूर केल्याबददल या ऐतिहासिक निर्णयाचे शहर भाजपाच्यावतीने स्वागत करण्यात आले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महिला मोर्चाच्या पदाधिका-यांनी पेढे वाटून जल्लोष केला. तसेच, हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबददल केंद्र सरकारचे आभार मानून घोषणाबाजी केली.
सर्वसामान्य नागरिकांना अभिप्रेत असलेले काम करणाऱ्या केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदनपर कार्यक्रम सामान्य नागरिकांसोबत लाडू वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे, सरचिटणीस वैशाली खाडे, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस शैलाताई मोळक, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, उषा मुंडे, निर्मला कुटे, गीता महेंद्रु, राजश्री जायभाय, नीता कुशारे, पल्लवी मारकड, प्रतिभा जवळकर, प्रीती कामतीकर, अलका मकवाना, कविता हिंगे, भारती विनोदी, जयश्री मकवाना आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पलांडे म्हणाल्या की, देशभरात महिला उत्सव साजरा करत आहेत. कारण, देशातील 69 कोटी महिलांसाठी महिला आरक्षण विधेयक अपेक्षित आहे. आता राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आहे. महिला यापुढे अर्ध्या लोकसंख्येसाठी धोरणे बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. विधेयकात लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशात महिलांसाठी सुमारे एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या जागांवरही हे लागू होईल. जनगणनेनंतर आरक्षण लागू होईल. जनगणनेच्या आधारे महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यासाठी सीमांकन केले जाईल. 15 वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षण दिले जाईल. तथापि, संसदेने बनविलेल्या कायद्याद्वारे निर्धारित केल्या जाणाऱ्या तारखेपर्यंत ते सुरू राहील.
Reviewed by ANN news network
on
९/२४/२०२३ १०:२४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: