पुणे : माजी नगरसेवक उदय जोशी व त्यांच्या मुलावर आर्थिक फ़सवणूक प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनी जवळपास १०० जणांची फ़सवणूक करून २५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा आहे.
या प्रकरणी मंगेश जगदिश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून उदय त्र्यंबक जोशी (वय ६५) आणि त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी (वय ४६, रा. पानमळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
माजी नगरसेवक उदय जोशी व त्यांच्या मुलाने जवळपास १०० जणांना स्वतःच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, परतावा अथवा मूळ रक्कम परत दिली नाही. फ़िर्यादीने रक्कम परत मागितली त्यांना तुला तुझ्या जीवाची भिती वगैरे वाटत नाही काय असे त्याला धमकावले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आतापर्यंत सुमारे ९ जणांनी जोशी पितापुत्राविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या आहेत.
उदय जोशी हे सदाशिव पेठेतून १९९७ ते २००२ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या नगरसेविका होत्या. फिर्यादी व अन्य ८ जणांनी पुढे येऊन तक्रारी दिल्या आहेत. जवळपास १०० जणांची २५ कोटी रुपयांवर फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे.
Reviewed by ANN news network
on
९/२४/२०२३ ०३:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: