भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बालंबाल बचावले!; गणेशाची आरती सुरू असताना मंडपाला लागली आग (VIDEO)
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बालंबाल बचावले आहेत. पुण्याच्या आंबिलओढा परिसरातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणेशाची आरती २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी नड्डा यांच्या हस्ते सुरू होती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्यासोबत होते. आरती करत असताना मंडळाने उभारलेल्या देखाव्यातील मंदिराच्या कळसाला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी नड्डा यांना तातडीने मंडपाबाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाची वाहने तेथे पाठविण्यात आली. तथापि त्यापूर्वीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने आग विझली.
या मंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बालंबाल बचावले!; गणेशाची आरती सुरू असताना मंडपाला लागली आग (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२३ ११:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: