उल्हासनगर : उल्हासनगर येथे असलेल्या सेंच्युरी कंपनीमध्ये उभ्या असलेल्या टँकरमधील टाकीचा स्फ़ोट आज दुपारी झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत.
शैलेश राजकरण यादव (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर, कंपनीतील कर्मचारी सागर झाल्टे (वय ४४), वाहन चालक पंडित मोरे, सफाई कर्मचारी प्रकाश आनंद निकम (वय ३४), दुर्घटनाग्रस्त टँकरचा हेल्पर हंसराज सरोज (वय ५२) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सेंच्युरी कंपनीमध्ये सोडियम सल्फाईड भरण्यासाठी एमएच ०४ एससी २४३७ या क्रमांकाचा टँकर आला होता. हा टँकर सीएस२ डिपार्टमेंटच्या बाजूला उभा करण्यात आला होता. त्यावेळी अचानक टँकरच्या टाकीचा स्फ़ोट झाला. स्फ़ोटाची तीव्रता इतकी होती की, या स्फ़ोटात टाकी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२३ ०८:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: