मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. काल ११ जुलै रोजी, मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर या संदर्भात बैठक झाली बैठकीला प्रफ़ुल्ल पटेलही उपस्थित होते.
या बैठकीत मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यावर सविस्तर चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांनी अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक या खात्यांचा आग्रह धरला असून अर्थखाते राष्ट्रवादीला देण्यास शिंदेगट राजी नाही. अजित पवार निधी रोखून आपली गळचेपी करतील अशी भिती शिंदे गटातील काही नेत्यांना वाटत आहे. तथापि कालच्या बैठकीत अंतीम निर्णय झाला असून त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आज काही महत्वाची घोषणा करतील असे समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: