चौथ्या गांधी दर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद

 


पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात   एकदिवसीय ' गांधी  दर्शन   शिबिराला ' चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. ९ जुलै  २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात हे शिबीर  गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे झाले. ' गांधी  दर्शन   शिबिर ' मालिकेतील हे चौथे शिबीर होते.

या शिबिरात ज्येष्ठ लेखक अशोककुमार पांडेय यांनी 'राष्ट्रपिता म्हणून गांधीजींचे स्थान' या विषयावर,प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी 'गांधी-आंबेडकर आणि देशाचे भवितव्य' या विषयावर मार्गदर्शन केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष  आणि युवक क्रांती दलाचे  संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी 'सत्याग्रह शास्त्र' या विषयावर मार्गदर्शन केले.

सचिन पांडुळे यांनी सूत्रसंचालन केले. सुदर्शन चखाले यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. अॅड. राजेंद्र दुरुगकर यांनी वक्त्यांचा सत्कार केला. जांबुवंत मनोहर, संदीप बर्वे, मिलिंद गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अशोककुमार पांडेय म्हणाले, ' देश भौगोलिक अस्तित्व नसते, तर वैचारिक रुप , ओळख असते.गांधी विचारधारा, सशस्त्र क्रांतीची विचारधारा, धर्मवादी विचारधारा स्वातंत्र्यपूर्व काळात उपस्थित होत्या. धर्माधिष्ठीत राष्ट्र हे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी स्वातंत्र्यलढयात सहभाग घेतला नाही.

संविधान हेच आपल्या भारतीय विचारधारेचे सार आहे. विचारधारात्मक भारताचा जन्म गांधींजींमुळे झाला, ते जैविक पिता नव्हेत , तर वैचारिक जन्मदाते आहेत.

सर्वप्रथम १९४२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. देशाने त्यांना राष्ट्रपिता मानले होते. महात्मा मानले होते.ही उपाधी कोणत्या नियमात , चौकटीत बांधता येत नाही. गांधीजींनी त्यांच्या अलौकिक जगण्यातून हा सन्मान प्राप्त केला होता.


लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य गांधीजींच्या विचारधारेने दिल्याने त्यांच्या विरोधात बोलता आले, हे विसरून चालणार नाही.  कोणत्याही लोकशाहीत  खुन्याचे उदात्तीकरण होत नाही, पण, भारतात हे वर्षानुवर्षे चालू आहे.

पांडेय म्हणाले, ' स्वातंत्र्यलढयातील सर्व नेत्यांमध्ये कोणत्या मार्गाने जावे, याबद्दल मतभेद होत पण, त्यांचे ध्येयाबद्दल मतभेद नव्हते. मतभेद हे जिवंत लोकशाहीचे लक्षण होते, हुकूमशाहीत मतभेद होत नाहीत, तर हत्या होतात.

'द्वी- राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे जिना, सावरकर फाळणीला जबाबदार आहेत की हिंदू - मुस्लीम एकतेचा प्रयत्न करणारे गांधी फाळणीला जबाबदार आहेत, याचा विचार करावा ', असेही पांडेय म्हणाले.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ' अस्पृश्यता निर्मूलनाचे मोठे काम गांधींजींनी केले. ५ हजार मंदिरे खुली झाली, हॉटेले खुली झाली. डॉ.आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात मतभेद होते, पण, आदरभावही होता. सत्याग्रहाला गांधीजींनी वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. हा मार्ग कायम दिशादर्शक राहिल

चौथ्या गांधी दर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद चौथ्या गांधी  दर्शन  शिबिराला चांगला प्रतिसाद Reviewed by ANN news network on ७/०९/२०२३ ०५:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".