भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' अनुभव ' या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यांजली डान्स ऍकॅडमीच्या विद्यार्थिनी शिष्या सहभागी होणार आहेत.भरतनाट्यम,लोकनृत्य,संथाल,कुमी,लंबाडी,बिहू,भांगडा,गरबा नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम शनीवार, १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७२ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: