पिंपरी : रुपीनगर, तळवडे येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मातोश्री गारमेंट या कापडाच्या दुकानात ८ जुलै रोजी रात्री घुसून सहा जणांनी कोयत्याने तोडफ़ोड करत दुकानदारास ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून दाखल झालेल्या तक्रारीचा तपास चिखली पोलीस करत होते.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यानंतर आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी रामेश्वर धनराज कांबळे, वय १९ वर्षे, रा. ओटास्किम, निगडी, पुणे. विलन ऊर्फ शुभम गजानन खवडे, वय १९ वर्षे, रा. रुपीनगर, तळवडे, पुणे. आदित्य गोरख दुनघव, वय १९ वर्षे, रा. ओटास्किम, निगडी, पुणे. गणेश परमेश्वर उबाळे, वय १८ वर्षे, रा. ओटास्किम, निगडी, पुणे. ओंकार शहाजी चंदनशिव, वय २० वर्षे रा सहयोगनगर, रुपीनगर, तळवडे. विशाल शंककर वैरागे वय १९ वर्षे रा ओटा स्किम निगडी यांना या प्रकरणी अटक केली आहे.
या पैकी चार आरोपी अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करत आहेत. अल्पवयीन असल्याने त्यावेळी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नसल्याने त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही. पोलिसांनी आता त्यांना अटक केली असून या कारवाईमुळे रुपीनगर, तळवडे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या कारवाईबद्दल नागरिकांनी पोलिसांचा जाहीर सत्कारही केला.
ही कारवाई सहायक निरीक्षक राकेश गुमाने, हवालदार साकोरे, सावंत, शिंदे, नाईक राठोड, सुतार, पिंजारी, गायकवाड, शिपाई भोर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: