वाकड : माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत (VIDEO)

 


वाकड : माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली लूटमार करणा-या टोळीच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेला टोळी प्रमुख माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष असून तो सराईत गुन्हेगार आहे.

या प्रकरणी अनिकेत रविंद्र वाडीया वय २४ वर्षे रा. पीएमसी कॉलनी, पांडवनगर, शिवाजीनगर, पुणे  यांनी पोलिसात तक्रार दिली असून रमाकांत ऊर्फ बबलू राजेंद्र जोगदंड वय ३० वर्षे रा. मंगलनगर वाकड पुणे, समीर ऊर्फ बबलू नझीर शेख वय ३३ वर्षे रा. माँ गंगा कॉलनी नढेनगर काळेवाडी पुणे, मयूर बाळासाहेब सरोदे वय २३ वर्षे रा. समीर भुजबळ चौक, पुनावळे पुणे, करण सदाफळ चव्हाण वय २४ वर्षे रा.पिरबाबा मंदीराजवळ पुनावळे गावठाण पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

५ जुलै रोजी सायंकाळी  सात वाजण्याच्या सुमारास स्टार बाझार समोर माऊली चौक वाकड येथे  वाडिया यांच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीज सर्व्हिसेस प्रा.लि. चे असिस्टंट मार्केटींग एक्झीक्युटीव्ह सूर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे प्रमोशनल अॅक्टीव्हीटी करत असताना आरोपी  फॉर्च्युनर गाडीतून तेथे आले. आरोपी  बबलू जोगदंड याने  फिर्यादी व त्याच्या सहका-यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असून माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे काय ठेवले ? काम कसे काय करत आहात? असे विचारून  लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचे हातातील टायटन कंपनीचे घडयाळ व हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन निघून गेले.

या प्रकरणी वाकड पोलीसठाण्यात ६४०/२०२३ क्रमांकाने भादंविक ३९४,५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना आरोपी वाशी, नवी मुंबई येथे लपून बसले असल्याची  माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना अटक केली. 

या टोळीचा प्रमुख बबलू  जोगदंड याच्यावर ५ गुन्हे दाखल असून समीर शेख याच्यावर १ गुन्हा दाखल आहे.

 कोणीही माथाडी संघटनेच्या नावाने धाकदपटशा केल्यास अथवा  खंडणी मागीतल्यास निर्भयपणे तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास ( संपर्क क्र. (०२०) २७३५२५००, ११२) या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ  निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे पोलीस, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अनिल लोहार, उपनिरीक्षक मकसूद मणेर, सचिन चव्हाण, सहायक फ़ौजदार  बिभीषण कन्हेरकर,  बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे,  हवालदार वंदु गिरे, संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, नाईक प्रशांत गिलबीले, अतिक शेख, शिपाई अजय फल्ले,  तात्या शिंदे,  कौतेंय खराडे,  भास्कर भारती,  स्वप्निल लोखंडे,  सौदागर लामतुरे,  रमेश खेडकर,  सागर कोतवाल, हेमंत गुत्तीकोंडा,  सागर पंडित यांनी केली.

वाकड : माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत (VIDEO) वाकड : माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत (VIDEO) Reviewed by ANN news network on ७/१०/२०२३ ०३:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".