मराठवाडा : फ़रदापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; प्रहार संघटनेची मागणी
जिल्ह्यात खळबळ!
दिलीप शिंदे
सोयगाव : सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापुर ता.सोयगाव येथील उपअभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दि.०९ रविवारी गृहमंत्री, ग्रामीण पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सोयगाव पोलीस ठाण्यामार्फत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव-बनोटी रस्त्यावर दि.०५ बुधवारी सकाळी अकरा वाजता खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिडका येथील मोहसीनखा कासमखा पठाण (वय २७) हा अपघातात ठार झाला तर दि.०८ शनिवारी रात्री दहा वाजता दुचाकी खड्ड्यात आदळून संजय मगन दळवी (वय २९) रा. तरोडा शेवगा ता.मोताळा जि. बुलढाणा हा अपघातात ठार झाला. खड्डयामुळे हे दोन्ही अपघात होऊन दोन युवक ठार झाल्याच्या बातम्या अनेक दैनिकातून प्रकाशित झाल्या होत्या. सोयगाव-बनोटी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून दुरुस्ती केली जात नाही.सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापुर चे उपअभियंता यांच्या दुर्लक्षामुळे अपघात होत असून याला सर्वस्वी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापुर हेच दोन्ही युवकांच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सोयगाव पोलीस ठाण्यामार्फत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सोयगाव-बनोटी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापुर यांच्या हलगर्जीपणा मुळे दुरुस्ती केली जात नाही. मार्च अखेरीस थातुरमातुर खड्डे बुजविले जातात.आणि संगनमताने बिले काढली जाते. सार्वजनिक बांधकाम उप विभाग फरदापुर हे वाहनधारकांच्या जीविताशी खेळत असून अश्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे.वेळ पडल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याची आमची तयारी आहे.
संदीप इंगळे
प्रहार अपंग क्रांती आंदोलन तालुकाध्यक्ष सोयगाव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: