मुंबई : दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर एक चक्रीवादळ तयार झाले असून त्याला ’बिपोरजॉय’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. मागच्या तीन तासात हे वादळ ११ किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकले आहे.
त्याचा वेग ४०-५० ते ६० किलोमीटर प्रति तास असावा असा अंदाज आहे. यादरम्यान समुद्रात उंच लाटा उसळतील.त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत चक्रीवादळ जवळपास उत्तरेकडे सरकण्याची आणि आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील दबाव क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये असा इशार देण्यात आला आहे.
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२३ ०९:५२:०० PM
Rating:




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: