रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज

महाड : किल्ले रायगडावर ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी जमलेल्या शिवप्रेमींची गर्दी अनावर झाल्याने जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असल्याचे वृत्त आहे. 

या प्रकरणी असे समजते की; आज ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी रायगडावर किमान अडीच लाख शिवभक्त जमा झाले होते. गर्दी वाढली. त्यामुळे चेंगराचेंअगरी होऊ नयेव म्हणून पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. परंतू गर्दी काबूत आणणे अशक्य झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. 

सोहळ्यासाठी उपस्थित असलेले छत्रपती संभाजीराजेही शिवभक्तांना शिस्त पाळण्याच्या सूचना करत होते. परंतु तरीदेखील गर्दी ऐकत नव्हती. त्यामुळे रायगडावरून खाली उतरताना प्रवेशद्वारावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले.  

रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज Reviewed by ANN news network on ६/०६/२०२३ ०६:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".