जळगाव : ब्राईट युथ फाऊंडेशनतर्फे (BYF) जळगावातील मुस्लिम कॉलनी परिसरात नुकतेच मोफत मतदान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये नवीन मतदान कार्ड व मतदान कार्डमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. या शिबिरात ७० हून अधिक लोकांच्या मतदान पत्रिकांमध्ये नवीन मतदान कार्ड व दुरुस्त्या करण्यात आल्या.
यावेळी ब्राईट युथ फाऊंडेशनच्या अध्यक्षा शीबान फाइज़ यांनी समाजात आपले कार्य करत राहणार असून त्याच बरोबर शहरी लोकांचे प्रश्न शक्य तितके सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून विद्यार्थी व युवकांना आवाहनही केले की या फाऊंडेशन विद्यार्थी आणि तरुणांचे आहे. म्हणूनच या फाउंडेशनमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा आणि शहरातील तरुण आणि विद्यार्थ्यांची शक्ती मजबूत करण्यासाठीब्राईट युथ फाऊंडेशनला पाठिंबा द्या. ब्राईट युथ फाऊंडेशन अध्यक्ष शीबान फैज, उपाध्यक्ष अक्रम देशमुख, सोशल ग्रुपचे अध्यक्ष समीर खान, मुस्लिम कॉलनी युनिटचे अध्यक्ष हुजैफा शेख, मुस्लिम कॉलनी उपाध्यक्ष अरबाज खाटिक, सोशल मीडिया अध्यक्ष रिजवान शेख, दानिश खाटीक, फैजान शेख, जलाल भाई, मोहसीन भाई, मुसाववीर भाई आदी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२३ ०५:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: