दिलीप शिंदे
सोयगाव : शहरातील न्यू प्रदीप चित्रमंदिरामध्ये द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी थिएटरचे संचालक प्रदीप जैस्वाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
द केरला स्टोरी हा चित्रपट सर्व देशभर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा. तसेच सोयगाव शहरातील न्यू प्रदीप चित्रमंदिरमध्ये लवकरात लवकर प्रदर्शित करण्यात यावा. या मागणीसाठी थिएटरचे संचालक प्रदीप जैस्वाल यांची युवा नेते अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली व हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. जेणेकरून सोयगाव शहरातील जनतेला सत्यघटनेवर आधारीत व एक दर्जेदार चित्रपट बघण्यास मिळेल. या वेळी युवा नेते अजय पाटील, मयूर हिरे, विरेंद्र मालोदे, निलेश वाघ, रितेश वाघ, अतुल अस्वार, राहुल वाघ, तुषार जाधव, कृष्णा सोनवणे, अदित्य सोनवणे,संकेत पाटील, प्रशांत नवगिरे, सागर राऊत,गौरव मंडवे, साहिल परदेशी, हृतिक फुसे , पवन लाठे, गोपाळ चौधरी आदींसह असंख्य युवक उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२३ ०६:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: