मराठवाडा : गारपिटीमुळे जखमी झालेल्या बगळ्याला जीवदान

 


 दिलीप शिंदे

सोयगाव  : सिल्लोड- शहरातील स्नेहनगरच्या पाठीमागील शेतात आढळलेल्या मरणासन्न अवस्थेतील बगळ्याला सिल्लोड येथील प्रसिद्ध डॉक्टर संतोष पाटील यांनी उपचार करून जीवदान दिले आहे.

सिल्लोड शहरातील स्नेहनगरच्यामागील शेतात जखमी अवस्थेतील एक बगळा शेख अजहर यांस आढळला. शहरातील डॉक्टर संतोष पाटील यांनी नुकतेच एका नागास जीवदान दिल्याची बातमी त्यांनी’अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये’ वाचली होती. त्यामुळे या बगळ्यावरही डॉक्टर उपचार करतील असे वाटल्याने त्यांनी हा बगळा डॉक्टर संतोष पाटील यांच्याकडे आणून दिला.

यावेळी तो मरणासन्न अवस्थेत होता. पाटील यांनी सूक्ष्म निरीक्षण  केल्यावर असे आढळले की त्याच्या डोक्याला उजवीकडे व उजव्या खांद्यावर गारपीट किंवा दगड यांचा फटका बसला आहे व त्या जखमेला व पूर्ण अंगावर मुंग्या लागल्या होत्या. तसेच त्याने पूर्ण मान टाकलेली होती व पायाचे स्नायू पूर्ण आखडले होते.शरीराचे तापमान 15 सेल्सिएस इतके होते जे 35 ते 40 सेल्सिअस हवे होते. तीन पावसात पडून असल्याने व गारवा, गारपीट यामुळे त्याला हायपोथर्मिया झाला होता. व मसल स्टीफनेसही होता.  डॉक्टर संतोष पाटील यांनी पटापट जखम स्वच्छ केली. पूर्ण शरीरावरील मुंग्या काढून टाकल्या. जखमेवर  अँटीबायोटिक कोटिंग करण्यात आले.आखडलेले स्नायू मोकळे व्हावेत यासाठी इन्फ्रारेड लाइटने शेक  देऊन  पायांची हालचाल व्यवस्थित करण्यात आली.स्नायूमध्ये बळ यावे म्हणून कॅल्शियमची मात्राही देण्यात आली.

सुरुवातीला या बगळ्याला ड्रॉपरने पाणी पाजावे लागत होते. काहीकाळानंतर तो ग्लासातील पाणी स्वत:च पिऊ लागला. त्याने अन्नही घेतले.  त्याच्या हालचाली वाढल्याने त्याला  रजाळवाडी तलावात पाण्यात  सोडण्यात आले. मात्र, त्याला पूर्ण बरे होण्यासाठी अजून,2  ते 3 दिवस ठेवावे लागेल असे डॉ पाटील यांनी सांगितले. 

 

वाचविण्यात यश आलेला हा पक्षी ब्लॅक बिल एर्गेट हा बगळा चा प्रकार असून मादी जातीचा असून स्त्रीत्व हे विपरीत परिस्थितीत  सहज हार मानत नाही हे निसर्गातील सत्य आहे. पूर्ण वाढ झालेली आहे.उजवा पंख व डोक्यावर त्यास मार लागल्याने मेंदू चे नियंत्रण हरवल्याने पायाचे पेरोनस लोंगस हे  स्नायू आखडले होते.त्यासाठी शेक ,मसाज व इतर उपाय  एक मिनिट ही उसंत न घेता करण्यात आले.पक्षी आणून देणारे बंधु व मला या कामी मदत करणारे विनोद माळी,शुभम आरके,गणेश पारवे,रामू घोडके यांनी मौलिक साथ दिली म्हणून मी मिशन भरारी राबवू शकलो.

-डॉ.संतोष पाटील,जैवविविधता संवर्धक,अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड

मराठवाडा : गारपिटीमुळे जखमी झालेल्या बगळ्याला जीवदान मराठवाडा : गारपिटीमुळे जखमी झालेल्या बगळ्याला जीवदान Reviewed by ANN news network on ५/०७/२०२३ ०४:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".