परभणीमध्ये राज्यात सर्वाधिक ४४ अंश तापमान; विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता!

 पुणे : राज्यातील तापमानात वाढ झाली असून  जोरदार उन्हाचे चटके बसू लागले आहेत. आज परभणीमध्ये सर्वाधिक ४४ डीग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी २० डीग्री सेल्सिअस तापमान राहिले. सकाळी अकरा वाजल्यानंतर राज्यातील सर्व भागात उन्हाचे असह्य चटके बसण्यास सुरुवात होत आहे. आज जळगाव जिल्ह्यात एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू  झाल्याचे वृत्त आहे.

हवामानखात्याने पुढील दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडे आणि उष्ण राहील.

नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी उन्हात घराबाहेर पडू नये. भरपूर पाणी, सरबत घ्यावे अशी सूचना करण्यात आली आहे.





परभणीमध्ये राज्यात सर्वाधिक ४४ अंश तापमान; विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता! परभणीमध्ये राज्यात सर्वाधिक ४४ अंश तापमान; विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता! Reviewed by ANN news network on ५/२१/२०२३ ०७:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".