मंदार आपटे
खेड : शहरातील खेड नगरपरिषदेच्या मालकीची असणारी व्यापारी संकुले सध्या कचराकुंड्या झाल्या आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संकुलाच्या पाय-यांवर कचरा साठवला जात आहे.
या व्यापारी संकुलामध्ये खेडचे रजिस्ट्रार कार्यालय आहे. येथे मुंबई, पुणे या सह अनेक शहरांमधून पक्षकार येतात त्यांना येथील कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. यावेळी लोकांसमोर खेड नगर पालिका प्रशासन चां एक वेगळा पंचनामा होतो कचऱ्या च्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. यावेळी लोकांसमोर खेड नगरपरिषदेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जातात. लोक येताना नाकावर रुमाल घरून ये जा करतात.या संकुलामध्ये अनेक वकीलांची ऑफिसे आहेत.अनेक दुकाने आहेत. येथे कपडे, खाद्य पदार्थ फुल विक्री,चहा दुकान, स्टेशनरी,फोटोग्राफी झेरॉक्स सेंटर, दैनिकाचे कार्यालय, एक पतपेढी, लहान मुलाची शाळा अशी अनेक दुकाने आहेत त्यामुळे हे संकुल नेहमी गजबलेले असते.
अशा गजबलेल्या ठिकाणी सफाई कर्मचारी का स्वच्छता ठेवत नाही हा एक प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी खेड परिषदेला दिल्लीदरबारी स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता.असे पुरस्कार घेत असताना या संकुलात मात्र सिगरेटची पाकीटे, दारू च्या बाटल्या अशा गोष्टींचा खच पडलेला असतो...या ठिकाणी रोजच्यारोज सफाई कर्मचारी का येत नाही याचा प्रश्न येथील व्यावसायिकांना पडतो.
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२३ १०:३०:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: