पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणा-या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे कर्मचारी हिंजवडी पोलीसठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना लक्ष्मी चौक ते मारुंजी या रस्त्यावर असलेल्या कोलते पाटील प्रोजेक्ट, आर १ जी बिल्डींग, १४ वा मजला, फ्लॅट नंबर १४०५ येथे क्रिकेट मॅचवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा घातला.
तेथे सट्टा घेत असलेल्या ६ जणांना अटक केली. वैभव बाबाराम डिक्कर, वय २८ वर्षे, मूळ रा.बजरंगबली मंदिराजवळ, रामटेकपुरा, वॉर्ड नंबर १६, अकोट ता. अकोट जि. अकोला, सचिन गंगाराम आजगे,वय २३ वर्षे,मुळपत्ता-वसमाल,ता.साकरी, जि.धुळे, विकास कैलास लेंढे वय-२२ वर्षे, रा.राहु पिपळगांव पो.कोरेगाव ता.दौड,जि.पुणे, ओमकार बिरा भांड, वय-२० वर्षे, रा.राहु पिपळगांव पो. कोरेगाव ता. दौड, जि. पुणे, आशिष निरंजन देशमुख,वय २८ वर्षे,मु.कोळीवेडी ता.अकोट जि. अकोला, महेश परमेश्वर काळे, वय ३३ वर्षे, रा. फ्लॅट नंबर १, जी विंग,बिर्ला गेट,अकोला, अशी अतक केलेल्यांची नावे असून राम भानुशाली, विकास रायसिंग चव्हाण, प्रकाश भगवानदास तेजवाणी यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींकडून ४ लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीं विरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे ६३५ / २०२३ क्रमांकाने भादंवि कलम ४२०, ३४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ),५ व भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गाढवे करत आहेत.
ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, विजय कांबळे, अंमलदार सुनिल शिरसाठ, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंमलदार नागेश माळी यांनी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२३ ०६:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: