‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत चित्रकला व शास्त्रीय संगीत या दोन अभिजात कलांची एकत्र गुंफण असलेल्या 'मधुर सुरांतून चित्र बोलते ' या भाग्यश्री गोडबोले यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत त्यांनी चितारलेल्या राधाकृष्ण लघुचित्रांचे प्रदर्शन आणि त्या चित्रांवरील त्यांच्या स्वरचित शास्त्रीय संगीतातील बंदिशींचे सादरीकरण असा एकत्रित कलासंगम रसिकांना अनुभवता येणार आहे. आविष्कार क्रिएशन्स्, पुणे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे .
कार्यक्रमामध्ये चित्रकार- गायिका भाग्यश्री गोडबोले; तसेच मीनल जोशी - परांजपे आणि मेघना सहस्रबुद्धे-खंडकर सहभागी होणार आहेत . अथर्व कुलकर्णी (संवादिनी) आणि रोहन चिंचोरे (तबला) हे साथसंगत करणार आहेत.सुप्रिया निजामपूरकर निवेदन करणार आहेत.
१३ मे २०२३ रोजी शनिवार सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६५ वा कार्यक्रम आहे.
भारतीय विद्या भवनमध्ये १३ मे रोजी 'मधुर सुरांतून चित्र बोलते' कार्यक्रम
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२३ ०२:१५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२३ ०२:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: