चंदिगड : कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात बजरंगदलाची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या दहशतवादी संघटनेशी तुलना करण्यात आली असून याविरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेच्या चंदीगड प्रभागाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटीस पाठवून काँग्रेस पक्षाच्या विरोधात १०० कोटी १० लाख रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे, अशी माहिती ‘विश्व हिंदु परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी दिली. ‘पी.एफ्.आय’.ला वाचवायचे काँग्रेसी षडयंत्र?’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.
यावेळी बंसल म्हणाले की, बजरंग दलावर दोषारोपण करून जिहादी संघटना पी.एफ.आय.ला वाचवायचा जर काँग्रेस प्रयत्न करत असेल, तर ते कधीच सफल होणार नाहीत.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या शुभा नाईक म्हणाल्या की, बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने केली असली, तरी कुठल्याही राज्य सरकारला विशिष्ट संघटनेवर बंदी घालण्याचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार नसतो. पी.एफ.आय.वरसुद्धा आम्ही बंदी आणू असे कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे. पी.एफ.आय. वर आधीच केंद्र सरकारने बंदी आणली असतांना कर्नाटक काँग्रेस त्यांच्यावर वेगळी कुठली बंदी आणणार? काँग्रेस मतपेटीच्या राजकारणासाठी हे सर्व करत आहे.
‘हिंदु जनजागृती समिती’चे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे म्हणाले की, बजरंग दल आणि पी.एफ.आय. यांची तुलनाच होऊच शकत नाही; कारण बजरंग दल राष्ट्रभक्त संघटना आहे, तर पी.एफ.आय. एक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी संघटना आहे. हिंदू संघटनांना बदनाम करणे हा काँग्रेसचा इतिहास राहिला आहे. फक्त बजरंग दलच नव्हे तर यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी अनेक हिंदू संघटनांवर काँग्रेसने बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र जिहादी संघटनावर बंदी आणावी यासाठी काहीच केले नाही. हिंदू समाज आता जागृत होत असून सर्व हिंदू संघटनांच्या सोबत उभा राहणार आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२३ ०२:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: