पुणे : मेट्रोच्या पुलासाठी लागणारे लोखंडी स्ट्रक्चर वाहून नेणा-या ट्रेलरवरून ते स्ट्रक्चर पुण्यातील वाकडेवाडी एस.टी. बसस्थानकाजवळ घसरून खाली पडल्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.
अपघाताचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुस-या लेनमधून दुहेरी वाहतूक सुरू करून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान क्रेन आणून रस्त्यात पडलेले लोखंडी स्ट्रक्चर बाजूला करण्याचे काम चालू आहे. तथापि, दुर्घटनास्थळानजिकच एस.टी. स्थानक आहे. हा भाग वर्दळीचा आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
पुणे : मेट्रोचे लोखंडी स्ट्रक्चर ट्रेलरवरून रस्त्यात पडल्यामुळे वाहतूक कोंडी
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२३ ०१:४६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२३ ०१:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: