मंदार आपटे
खेड : खेड शहरातील अनेक वर्ष भक्तांच्या हाकेला धावणारी श्री देवी पाथरजाई हिचा शिमगोत्सव मोठ्या दिमाखाने साजरा केला जातो, देवीची रुपे पालखीमध्ये घेऊन पालखी लोकांच्या घरी नेली जाते. ही पालखी सुंदर सजवून तिची विधिवत पूजा करून मानकरी आपल्या घरी पाथरजाईची पालखी घेऊन जातात व वाजत गाजत शहर प्रदक्षिणा करत खेड वासियांना देवीची सेवा करण्याची संधी देतात. या पाथरजाईचा हा उत्सव पाह्ण्यासाठी खेड शहराच्या बाहेरून भाविक येत असतात.
श्रीदेवी पाथरजाई ची मूर्ती ही देवीच्या माहेश्वरी स्वरुपात असून भगवान माहेश्वर अर्थात शिवशंकरांची मूर्तीमंत शक्ती म्हणजे भगवती माहेश्वरी म्हणून हिचे स्वरूप देखील शिवाच्या रूपाप्रमाणेच आहे. शांत बसलेला नंदी त्याच्यावर प्रत्यासिढ म्हणजे एक पाय खाली व एक पाय नंदीच्या मानेवर ठेऊन बसलेली, अंगावर पूर्ण साडी चोळी, चारही हातात नागाची कंकणे, पायात नागाची नक्षी असलेले तोडे उजव्या खालच्या हातात त्रिशूल त्याला लावलेला डमरू, वर खंटवांग म्हणजे हाताच्या दंडावर कवटीच्या आकाराची नक्षी असलेला दंड, डाव्या वरच्या हातात नाग तर खालचा हात नंदीच्या वशिंड म्हणजे या स्वरूपाविषई दुर्गा साप्तशक्तीच्या पाठामध्ये उल्लेख आहे.
या देवीच्या उपासनेचे सोमवार, मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा यासह नवरात्रीत नऊ दिवस, शिमग्यात पाच दिवस यासह दिवाळीत असे अनेक सण येथील खेड वासीय मोठ्या उत्साहाने साजरे करतात. यादेवीचे विश्वस्त पाटने, शेट्ये, महाजन, चीखले असे आहेत. या देवीला काळकाई देवीची बहीण म्हणून ओळखले जाते. खेड शहरातील अनेक भक्तगण पाथरजाई देवीच्या चरणाशी लीन होताना दिसतात. या देवीचे मंदिर खेड शहराच्या मध्यभागी आहे, या मंदिराला नवरात्रमध्ये आकर्षक अशी रोशनाई केली जाते. ही रोशनाई पाहण्यासाठी आबालवृद्ध मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात, या देवीचे सर्व उत्सव मोठ्या उत्साहाने, नियोजनबद्ध असे साजरे केले जातात.
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२३ ०५:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: