मंदार आपटे
गुहागर : गुहागर, खालचा पाट शिमगोत्सव मंडळ आयोजित लकी ड्रॉ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या वेळी एकूण ८० बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या लकी ड्रॉ मध्ये प्रथम टी.व्ही.चे मानकरी गुहागरचे सत्वशीला गोयथळे, दुसरे बक्षीस रत्नागिरी येथे त्रिशा खातू यांना वॉशिंग मशिन, व तिसरे बक्षिस फ्रीज चे मानकरी मधुरा मंदार आपटे खेड, यांना मिळाले. तर गौरव शेट्टे यांना पंखा यासह घड्याळ, कुकर, मिक्सर अश्या ८० बक्षिसांचे जिल्ह्याबाहेरचे मानकरी ठरले आहेत.
हा लकी ड्रॉ यशस्वी करण्यासाठी गुहागर खालचा पाट शिमगोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेस परिश्रम घेतले.
या शिमगोत्सव मंडळात ७ ते ८ दिवस सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन देवीचे कार्यक्रम विधिवत करून शिमगोत्सव साजरा करतात ही परंपरा पूर्वपार असून आम्ही ती अशीच पुढे चालु ठेवू असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच बक्षिसाचे मानकरी ठरलेल्या सर्व विजेत्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
३/०८/२०२३ ०५:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: