पिंपरी : काळे कॉलनी, च-होली नजिक बीआरटी रस्त्यावर १८ मार्च रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मोटारसायकलवरून जाणारया व्यक्तीवर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणारया एकास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
हरिओम पांचाळ असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे, १८ मार्च रोजी रात्री सिध्देश गोवेकर रा. वडमुखवाडी ता.हवेली जि. पुणे हा बिआरटी रोड काळे कॉलनी समोरुन वडमुखवाडीकडे जात असताना आरोपी पांचाळ आणि त्याचा साथीदार या दोघांनी गोवेकर याचा मोटारसायकलवरून पाठलाग केला. पांचाळ याने गोवेकरवर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्या त्याला लागल्या नाहीत.
या प्रकरणी गोवेकर याने दिलेल्या फ़िर्यादीवरून दिघी पोलीसठाण्यात कलम ३०७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याच तपास सुरू असताना गुन्हेशाखा युनिट ३ च्या पथकाला आरोपी अलंकापुरम ते खडीमशीन रस्त्याने मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपीला पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि एक काडतूस मिळाले. पोलिसांनी पिस्तूल, काडतूस, मोटारसायकल आणि एक चोरलेला मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार- सचिन मोरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, शशिकांत नांगरे, समीर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखिल फापाळे, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
३/२२/२०२३ ०८:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: