ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदनउटीतून साकारले रांजणगावच्या महागणपतीचे रूप

आळंदी : येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर गुढीपाडव्याच्य निमित्ताने रांजणगावच्या महागणपतीचे रूप साकारण्यात आले. याचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले. अभिजित धोंडफळे व देवस्थानच्या सहकार्यातून हे रूप साकारण्यात आले. 

मंदिरात पहाटे साडेतीन वाजता घंटानाद झाला. साडेपाचच्या सुमारास पवमान पूजा व दुधारती  झाली. प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा करून माऊलींना साखरगाठी अर्पण करण्यात आली. त्यानंतर भाविकांना ‘श्रीं’च्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला.

दिवसभरात सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान वीस हजारांहून अधिक भाविकांनी देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदनउटीतून साकारले रांजणगावच्या महागणपतीचे रूप  ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदनउटीतून साकारले रांजणगावच्या महागणपतीचे रूप Reviewed by ANN news network on ३/२२/२०२३ ०९:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".