मुंबई : महिंद्रा तर्फे आपल्या पहिल्या ई-एसयूव्ही XUV400 साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400 व्हर्स सादर (VIDEO)




सखोल ब्रँड अनुभव प्रदान करण्यासाठी मिलेनियल आणि जेन-झेड ग्राहकांपर्यंत
 पोहोच मजबूत करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आज Metadome.ai द्वारे समर्थित आभासी जगात महिंद्राच्या ऑल-इलेक्ट्रिक XUV400 साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400verse चे अनावरण केलेफोटोरिअलिस्टिक ग्राफिक्सने परिपूर्ण अद्वितीय ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी ब्रँडच्या व्हर्च्युअल स्पेसना एकत्रित करून प्लॅटफॉर्म एक युनिव्हर्स म्हणून काम करेल. XUV400verse महिंद्राच्या उत्साही ग्राहकांना गुंतवून ठेवण्याससहयोग करण्यासएकत्र येण्यास सक्षम करेल आणि सखोल उत्पादन चर्चा होऊ शकेल.

 


महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, "XUV400verse आम्हाला उत्कृष्ट ग्राहक अनुभव निर्माण करण्यास सक्षम करेलआम्ही आमच्या तरुण SUV खरेदीदारांच्या समुदायाला आणि उत्साही व्यक्तींना त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत त्यांच्या घरच्या आरामदायी वातावरणातून या अनुभवासाठी आमंत्रित करतोआम्ही नाविन्यपूर्ण आणि सखोल अनुभव देत आमच्या तंत्रज्ञान-जाणकार ग्राहकांच्या पुढच्या पिढीला सुसंगत वातावरण प्रदान करत आहोत." XUV400verse मध्ये ग्राहकांना त्यांची सर्जनशीलता जोखण्यासाठी ब्रँड अद्वितीय अनुभव प्रदान करेल जसे की:

·         व्हर्च्युअल ब्रँड शोरूमसखोल व्हर्च्युअल शोरूमचे महिंद्राच्या ओळखीशी मजबूत साम्य आहेशोरूममध्ये गाइडेड आणि फ्री-रोम प्रवास ध्वनी परस्परसंवादी अवतारांसह एलईडी वॉल शोकेसिंग (लाइव्ह आणि नॉन-प्लेअर कॅरेक्टर्स एनपीसीआणि ब्रँड-लेड मर्चेंडाईज आणि अॅक्सेसरीजसह भविष्यकालीन डिझाइन आहे.

·         तुमचा स्वतःचा अवतार सानुकूलित करा: XUV400verse मधील अभ्यागत त्यांचे स्वतःचे अवतार तयार करू शकतात आणि त्यात सामील होऊ शकतात आणि त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना सामायिक अनुभवासाठी आमंत्रित देखील करू शकतात.

·         हायपर-रिअलिस्टिक ३ डी कार कॉन्फिगरेटर: वापरकर्ते हायपर-रिअलिस्टिक ३ डी कार कॉन्फिग्युरेटरसह सहभागी होऊ शकतातजे रिअल-टाइम कस्टमायझेशन सक्षम करतेरंग बदलू शकतात आणि SUV वैशिटयांचा इमर्सिव्ह फॉरमॅटमध्ये मागोवा घेऊ शकतात.

 

व्हर्च्युअल टेस्टड्राइव्हXUV400verse मल्टिपल मोड्स आणि कॅमेरा व्ह्यूजसह अशा प्रकारची पहिलीच व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह देखील होस्ट करते जिथे वापरकर्ता गेमिफाइड पद्धतीने SUV च्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ शकतोतसेच ब्रँड बिलबोर्ड आणि मोहक सिनेमॅटिक्ससह वातावरण निर्मिती देखील करता येते.

 

हा प्लॅटफॉर्म उत्कृष्ट उत्पादन परस्परसंवाद प्रस्थापित करतो आणि ग्राहक-प्रथम दृष्टिकोनासाठी महिंद्राची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

 

महिंद्रा XUV400verse ला भेट देण्यासाठी क्लिक करा:

https://mahindraelectricautomobile.com/xuv400/400verse


पहा ही नवी गाडी कशी असेल------

 


बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा 
मुंबई : महिंद्रा तर्फे आपल्या पहिल्या ई-एसयूव्ही XUV400 साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400 व्हर्स सादर (VIDEO) मुंबई : महिंद्रा तर्फे आपल्या पहिल्या ई-एसयूव्ही XUV400 साठी  मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400 व्हर्स सादर (VIDEO) Reviewed by ANN news network on १२/२१/२०२२ ०७:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".