पिंपरी : क्विक हिल फाऊ॑डेशनने दिलेल्या रुग्णवाहिकेचे हस्तांतरण

 



पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पदपथ अथवा रस्त्यावर राहणा-या लोकांकरिता आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्विक हिल फाऊडेशनमार्फत सीएसआर निधीतून महानगरपालिकेस रुग्णवाहिका देण्यात आली आहे. महानगरपालिकेचे सावली निवारा केंद्र चालवणा-या रिअल लाईफ रिअल पीपल या सामाजिक संस्थेकडे आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकेचे हस्तांतरण आज करण्यात आले.

          महानगरपालिकेच्या पिंपरी येथील प्रशासकीय मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,क्षयरोग कक्ष प्रमुख डॉ. अंजली ढोणे, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर, चारुशीला जोशी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, सीएसआर कक्ष समन्वयक विजय बावरे, क्विक हिल फाऊडेशनच्या संचालिका अनुपमा काटकर  रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे मोहम्मद हुसेन, आग्नेस फ्रान्सिस यांच्यासह सावली निवारा केंद्रात वास्तव्य करणारे नागरिक उपस्थित होते.

          पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे बेघरांसाठी सावली निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी बेघरांना विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत या केंद्राद्वारे ४०६ बेघर लोकांना लाभ देण्यात आला आहे. यापैकी सध्या ५७ लोक निवारा केंद्रात राहत असून उर्वरित ३४९ लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये आढळून येणा-या बेघरांच्या आरोग्य सेवेसाठी समर्पित रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फिरत्या आरोग्य यानरुपी रुग्णवाहिकेद्वारे शहरातील बेघरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

          सावली निवारा केंद्रात सध्या वास्तव्यास असलेल्या प्रतिनिधींसमवेत आयुक शेखर सिंह यांनी  यावेळी संवाद साधला. आयुष्याच्या उतरत्या काळात बेघर होण्याची वेळ आली, त्यामुळे अनेक संकटे आणि भीती यांचा सामना करावा लागला. अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेला हात जगण्याची नवी उमेद देणारा ठरला. निवारा केंद्रात मिळत असलेल्या चांगल्या सेवेमुळे समाजातील माणुसकी जीवंत असल्याचा सुखद अनुभव मिळत आहे. अशी भावना वयोवृद्ध मालन बनसोडे यांनी व्यक्त केल्या.

          यावेळी बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सावली निवारा केंद्राच्या माध्यामतून गरजू लोकांना होणारा फायदा या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट साध्य करणारा आहे. या केंद्रामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी आवश्यक सेवा देण्यावर महानगरपालिकेचा भर देत आहे. त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहावे याकरिता बेघरांसाठी आरोग्य यानरुपी समर्पित रुग्णवाहिकेचा आरोग्य तपासणी उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.  




पिंपरी : क्विक हिल फाऊ॑डेशनने दिलेल्या रुग्णवाहिकेचे हस्तांतरण पिंपरी : क्विक हिल फाऊ॑डेशनने दिलेल्या रुग्णवाहिकेचे हस्तांतरण Reviewed by ANN news network on १२/१५/२०२२ ०७:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".