पुणे : 'डॉ.पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२२’ जाहीर

 


 विश्वास कुलकर्णी,ह.भ.प.सोन्नर,प्रा.काकिर्डे,नीलिमा जोरवर ठरले मानकरी         
 
 डिसेंबर रोजी पुण्यात सन्मान  सोहळा

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि 'प्रबोधन माध्यम' यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे 'डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२'  जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ आर्किटेक्ट व्ही.के.ग्रुपचे संस्थापक  विश्वास कुलकर्णी(आर्किटेक्चर क्षेत्रात ५० वर्षे योगदान) ,ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर( लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष कीर्तन प्रबोधन),ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे( अर्थ साक्षरता ), 'कळसुबाई मिलेट्स' उत्पादक शेतकरी कंपनीच्या संस्थापक नीलिमा जोरवर ( भरडधान्य प्रसारातून महिला सक्षमीकरण ) यांची निवड  या वर्षीच्या ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’साठी करण्यात आली आहे.सन्मान सोहळा आयोजनाचे हे  चौदावे वर्ष आहे. 

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संस्थाअंतर्गत पुरस्कारासाठी डॉ.रोनिका आगरवाल (प्राचार्या,रंगूनवाला कॉलेज ऑफ   फिजीओथेरपी ), दिलीप देवडे( झेड.व्ही.एम युनानी मेडिकल कॉलेज गार्डनिंग विभाग) यांची निवड करण्यात आली आहे.

संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक बीडकर तसेच महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी ही माहिती पत्रकाद्वारे  दिली.‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२ 'चे वितरण २ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉल मध्ये ज्येष्ठ शैक्षणिक-सामाजिक कार्यकर्ते,अझीम प्रेमजी विद्यापीठाचे माजी मुख्य समन्वयक प्रशांत कोठडिया यांच्या हस्ते  करण्यात येणार आहे.

 ‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. डॉ.पी. ए. इनामदार यांचा  वा वाढदिवस २ डिसेंबर रोजी आहे. त्याही दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
पुणे : 'डॉ.पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२२’ जाहीर पुणे : 'डॉ.पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२२’ जाहीर  Reviewed by ANN news network on १२/२१/२०२२ ०३:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".