पिंपरी : गोवंश हत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायद्यासाठी सकल हिंदू समाज समन्वय समितीचा विराट मोर्चा
पिंपरी : गोवंश हत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदे संपूर्ण देशात लागू करण्यात या्वेत या मागणीसाठी रविवारी सकल हिंदू समाज समन्वय समिती पिंपरी चिंचवडच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला.चिंचवड येथील महावीर चौकात असलेल्या लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फ़डके यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चाचे पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यानजिकच्या मैदानात सभेत रुपांतर झाले.्मोर्चाचे नेतृत्व करणारया नेत्यांची भाषणे झाल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.
मोर्चात शहरातील अनेक संघटनांनी भाग घेतला. मोर्चाचे स्वरूप पाहता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आणि जुन्या मुंबई महामार्गाच्या सेवारस्त्यावरील वाहतूक थांबविली होती.गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा ही प्रमुख मागणी मोर्चातील नागरिक करत होते.
समारोप सभेत बोलणारया स्वरुपा भोई यांनी म्हटले की, ’आमचे सरकारला आवाहन आहे, की धर्मांतरण, गोहत्या, लव्ह जिहाद विरोधी कायदे करावेत. सगळ्या मुलींना आवाहन आहे, कि प्रेम करा पण डोळसपणे करा. डोळे उघडे ठेवून करा. त्यामुळे जे आपल्यावर धर्मांतरणाचे संकट आले आहे ते आपण टाळू शकू.”
सौरभ कर्डे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळजवळ वर्षभर गोतस्करी चालू आहे. भुलीचे इंजेक्शन देऊन गाईंना पकडून नेण्यात येते. आपले बरेच गोरक्षक त्याविषयी पालिकेत जाऊन निषेध करतात. हा प्रकार तात्काळ थांबायला हवा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: