पिंपरी : जॅकवेल गैरव्यवहार विधानपरिषदेत गाजणार!; अंबादास दानवे यांची लक्षवेधी



पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करण्याकरीता  जॅकवेल बांधण्यासाठी महापालिकेने निविदा मागविली होती.प्रस्तावित निविदा १२० कोटी रुपयांची असताना अन्य राज्यात काळ्यायादीत असलेल्या एका ठेकेदाराने १६७ कोटी रुपयांची बोली लावली. त्यालाच निविदा देण्यात आली. या कामाचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या हस्ते घाईघाईत उरकण्याचा महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते यांचा प्रयत्न होता.  मात्र, भाजपच्याच एका नगरसेविकेच्या संबंधित न्यूजपोर्टलने सर्वप्रथम याविषयी एक व्हिडिओ क्लिप प्रसारित करून या विषयाला वाचा फ़ोडली. त्यानंतर  राष्ट्रवादीने आंदोलन करून महापालिका प्रशासनाला पेचात पकडले. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून ही निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित ठेकेदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवला आहे. मात्र, आता या प्रकरणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या विषयी लक्षवेधी उपस्थित करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेता अंबादास दानवे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली असून उपसभापती निलम गो-हे यांनी ती स्वीकारली आहे. शासनाचे कक्ष अधिकारी ग. द. आलेवाड यांनी महापालिका प्रशासनाकडून याची अतितात्काळ माहिती मागविली आहे.

महापालिकेने या जॅकवेलचे काम गोंडवाना इंजिनिअरींग कंपनीला हे काम दिले असून या कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड  सरकारने कंपनीवर कारवाई केली आहे. असे असताना हे काम पालिकेने या कंपनीला दिले कसे? आणि १२० कोटी रुपयांची निविदा १६७ कोटी रुपयांची कशी झाली? असे प्रश्न या प्रकरणात निर्माण झाले आहेत. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांना यावर सभागृहात निवेदन करावे लागणार आहे. त्यावेळी महाआघाडीचे सदस्य मुख्यमंत्र्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्ट असल्याने त्यावेळी सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
पिंपरी : जॅकवेल गैरव्यवहार विधानपरिषदेत गाजणार!; अंबादास दानवे यांची लक्षवेधी पिंपरी : जॅकवेल गैरव्यवहार विधानपरिषदेत गाजणार!; अंबादास दानवे यांची लक्षवेधी Reviewed by ANN news network on १२/२०/२०२२ ०९:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".