पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरामधील विविध मिळकतींची बेकायदेशीरपणे मनमानी पद्धतीने नोंदणी करून शास्तीकर व मिळकतकर आकारणीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला जात आहे त्यामुळे महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
अनेक मिळकती बोगस कागदपत्रांच्या आधारे करसंकलन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून नोंदविण्यात आल्या आहेत. भूतपूर्व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कुलमुखत्यार पत्राच्या आधारे मिळकतींचे विभाजन, विभागणी व हस्तांतरण करू नये असा आदेश ५ ऑक्टोबर २०१९ रोजी काढला होता. मात्र काही अधिकारी व कर्मचारी संगनमताने हा आदेश धाब्यावर बसवून कुलमुखत्यार/नोटराईज्ड कागदपत्राच्या आधारे नोंदी करून महापालिकेचा कोट्यावधींचा मिळकतकर, शास्ती कर व राज्य शासनाचा मुद्रांक व नोंदणी शुल्क बुडवत आहेत. त्यामुळे महापालिकेचे व राज्य सरकारचे नुकसान होत आहे, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: